Monday, May 18, 2020

१९ व २० व्या शतकातील मराठी ज्ञानकोष संक्षिप्त इतिहास


१९ २० व्या शतकातील मराठी  ज्ञानकोष  संक्षिप्त इतिहास



            संदर्भ ग्रंथ हे विशिष्ट माहिती मिळवण्याच्या  उद्देशाने प्रकाशित केले जातात. संग्रहातील इतर सामान्य पु्स्तकांपेक्षा  यांची रचना ही अतिशय वेगळी असते.  ही रचना इच्छित माहिती सहजपणे मिळावी अशी असते.  तर इतर पुस्तकात विषय हा विशिष्ट  क्रमाने  प्रकरणांतुन मांडलेल असतो. स्थुलपणे असे म्हणता येईल की, संदर्भ ग्रंथ हे विश्वकोश, शब्दकोश, वार्षिके, मार्गदर्शिका. चरित्रात्मक साधने, भौगलिक साधने सूची सांखिकीय माहिती यात विभागलेले असतात. वरील यादीतील संदर्भ ग्रंथ स्थानिक भाषांत उपलब्ध केले गेले, तर त्या त्या मात्रुभाषेच्या  लोकांना माहिती शोधण्यांसठी उपयुक्‍त ठरतील.  या निबंधात मराठि भाषेतील ज्ञानकोष, शब्दकोष  इत्यादी बाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करणात आला आहे.

           
            संदर्भ सेवा ही आधुनिक ग्रंथाल्यातील एक महत्त्वाची सेवा आहे. वाचकांकडुन येणार्‍या प्रशनांना संदर्भ  ग्रंथांच्या मदतीने उत्तरे दिली जातात. त्यामुळे संदर्भ ग्रंथ हे संदर्भ सेवेचा  मुलस्त्रोत आहेत किंवा पाया आहेत.  योग्य परिपुर्ण संदर्भ ग्रंथ वाचकाला किमान वेळेत योग्य माहिती पुरवण्यात मदत करतात.


            विश्वकोश हे साधन असे आहे की, मिळत जाणारी प्रत्येक माहिती निवडुन तिला व्यवस्थित रूप देऊन विषयानुसार अकारविल्हे  त्यात सादर केली जाते.  हे कोश ज्ञानाच्या सर्व शा्खांवर किंवा एखाद्या विशिष्ट शाखेवर माहिती पुरवतात याची रचना विद्यार्थी या प्रौढ वयोगट लक्षात घेऊन केलेली असु शकते.  माहिती द्यावयाच्या विविध अपेक्षित विषयानुसार हा कोश मर्यादित असू  शकतो.  स्पष्टीकरणार्थ त्यात आलेख, चित्रे, यांचा वापर असू शकतो. 


            विश्वकोश आणि शब्दकोश हे ज्ञान  संग्रह करणे अध्यन अध्यापन पध्दतीतील महत्त्वाची साधने असतात  आणि जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये, की ज्यांत शैक्षणिक शाखा विकसित झालेल्या आहेत, त्यांत प्रकाशित होतात. ज्ञानशाखा विकसित झाल्या तशा आंतरशाखा देखील उदयास आल्या.(त्यामुळे) विश्वकोश शब्दकोश यांची गरज सर्व भाषांमध्ये जाणवू लागली.


            मराठी भाषेत झालेल्या प्रयत्नांचा मागोवा सुरूवातीपासुन  घेता येतो. ब्रिटिश राज्य ग्रंथालयांचा विकास हे घटकही प्रादेशिक भाषांत अशी साधने निर्माण होण्यास कारणीभुत ठरले.  या निबंधात संदर्भ ग्रंथांचे मुद्रण प्रकाशन मराठि भाषेत कसे झाले याचा आढावा घेतला आहे.




मराठीतील सर्वात जुने पुस्तक हे श्रीपतीचे  आहे. त्याच्याच नावावर अनेक संस्क्रुत ग्रंथही आहेत.  त्यातील "ज्योतीष रत्नमाला " या त्याच्याच ग्रंथाचे त्याने स्वत: मराठीत भाषांतर केले.  यामध्ये विवाह सोहळा व्रतबंधन, वास्तुशांत याच्याशी सबंधित विषय आहेत.  त्या  काळात समाजातील मोठ वर्ग मराठी भाषा बोलणारा होता.  त्यामुळे अशा भाषांतराची गरज जाणवली.  बाराव्या शतकातील महानुभवी ग्रंथांचे योग्दान सर्वज्ञात आहे.  मुकुंदराज यांच्या विवेसिंधुची रचना शके ११८८ मधील आहे.  याची गणना मराठीतील आद्य ग्रंथापैकी एक अशी होते. त्याच बरोबर  "अभिस्तार्थ चिंतामणी" हा एका चालुक्य राजपुत्राने रचलेला काव्यग्रंथ  (शके ११२९) ही बहुधा पहिली ज्ञात रचना असावी.  ही परंपरा पुढे ज्ञानेश्वर  (१२७५ ते १२९६), नामदेव (१२७० ते १३५०), तुकाराम  (१६०६ ते १६४९), रामदास (१६०८ ते १६८१),  एकनाथ (१५३३ ते १५९९), वामन पंडित (१७वे शतक ) आणि रघुनाथ पंडित (१७वे शतक)  यांनी चालू ठेवली.  मराठीला प्रोत्साहन मिळाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला शब्दकोश हा सर्वात जुना कोश मानला जातो.  उतर भारतातील मोगल साम्राज्यामुळे  त्यांच्या काळात मराठि भाषेत राज्यव्यवहारात पर्शियन, अरबी,  तुर्की  शब्दांचा प्रभाव  होता.  शिवाजी महाराजांना समानर्थी मराठि शब्दांचा संग्रह करावयाचा होता.  १६७४ साली त्यांनी रघुनाथ नारायण हणमंते  यांना राज्य व्यवहारात वापरल्या पर्शियन शब्दांसाठी संस्क्रुत  कोश करण्याचा आदेश दिला.  या कोशाचे शीर्षक "राज्यव्यवहार  कोश" असे होते.  त्यानंतर हे संकलन प्रथम १८८० साली छापण्यात आले.  २० व्या शतकाच्या सुरूवातीच्या दशकांत  वीर सावरकरांनि योग्य मराठी शब्द  सम्रूध्द  व्हावेत, या द्रुष्टीने  असेच  प्रयत्न  केले.


            साहित्याचा शोध घेताना असे लक्षात येते की, मराठीसाठी मुद्रण तंत्राचा  पहिला वापर १९व्या शतकात  करण्यात आला १८०५ साली पहिले मराठी पुस्तक छापले गेले, पण हस्तलिखित स्वरूपात मराठीतील अनेक ग्रंथ विविध ग्रंथांलयात आहेत.  सुरूवातील छापल्या गेलेल्या मराठी पुस्तकांची परिपुर्ण सूची तयार करण्याचे  प्रयत्न करण्यात आले.


            या सुरूवातीस छापल्या गेलेल्या मराठीतील  पुस्ताकांच्या  सू्चीच्या संकलनाचे श्रेय प्रा्ध्यापक कै. अ. का. प्रियोलकर यांना जाते.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  मराठीतील  या आद्य मुद्रीत (मराठी इनक्युनानुला) ग्रंथाचे संकलन "मराठी दोलामुद्रिते" हा ग्रंथ पी. एच. सहस्त्रबु्ध्दे यांनी  संकलित करून १९४९ साली छापला.  आद्य मुद्रित ग्रंथासठी दोलामुद्रिते  हा शब्द प्रियोलकरांनी रूढ केला तसेच या दोलामुद्रितांचा काळ  ठरविण्याचे कामही त्यांनी केले.  युरोपमध्ये इनक्युनाबुला  म्हणजे १५व्या शतकापर्यंत  मुद्रित झालेली  पुस्तके , पण मराठीसाठी (देवनगही) मुद्रण तंत्र  १९व्या  शतकात (१८०५) विकसित झाल्याने दोलामुद्रितांचा काळ हा १८०५ ते १८७६ असा ठरवण्यात  आला यामागे "डिलवरी आफ बुक्स  अक्ट १८६७ साली सुधारण्यात येऊन त्याद्वारे शासनाने प्रत्येक मुद्रित पुस्तकाच्या तीन प्रती शासनाकडे पाठवाव्यात असा कायदा केला, हे कारण होते.


            प्रियोळकरानंतर त्यांचे विद्यार्थी प्रा. सुरेंद्र  गावसकर यांनी हे काम पुढे चालू  ठेवले  मराठी दोलामुद्रितांची दुसरी सुधारित आव्रुत्ती १९६१ मध्ये संपादित केली.  या पुस्तकाची तिसरी आव्रुती  डा. गंगाधर मोरजे यांनी संपादित केली मुंबई  मराठी ग्रंथ संग्रहालयाने मुंबईत १९९५ साली प्रकाशित केली.  मराठी  दोलामुद्र्तिते या ग्रंथाच्या विविध आव्रुत्या हा मराठीतील आद्य मुद्रित पुस्तकाच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा मुख्य  स्त्रोत आहे. 

           
            विल्यम  करे हे मुद्रित मराठी पुस्तकातील महत्त्वाचे नाव होय. त्यांनी '' ग्रामर आफ मराठा लंगवेज या नावाचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यात नित्याच्या विषयावरील संवाद जोडण्यात आले होते.  ते फोर्ट येथील विल्यम  कालेज मराठीचे प्राध्यापक होते.  त्याच महाविद्यालयात काम करणार्‍या पंडित वैद्यनाथ शास्त्री यांनी त्यांना मदत केली.  हा शब्दकोश १८०५ साली प्रकाशित झाला. 1808 मध्ये त्याची दुसरी आव्रुती आली.  विल्यम करे यांनी पहिला मराठी इंग्रजी शब्दकोश १८१० साली प्रकाशित केला त्यांचे असे मत होते की, युरोपियन लोकांनी स्थानिक भाषा शिकाव्यात आणि त्याकरता शब्दकोश विश्वकोश स्थानिक भाषांत उपलब्ध करून द्यावेत.

            करे  यांच्या नंतर मेजर जनरल वान्स कण्डी (१७८४ ते १८४६)  यांचा '' डिक्शनरी  आफ मराठा लगवेज' हा कोश १८२४ मध्ये प्रकाशित झाला.  मुंबईत छापण्यात आलेल्या या शब्दकोशाचे दोन भागांत प्रकाशन झाले.  ते म्हणजे मराठी - इंग्रजी आणि इंग्रजी - मराठी ते सैन्यात असले तरी भाषा, साहित्य पौर्वात्य  इतिहास - खास करुन भारत, यांत त्यांना अतिशय रस होता.  रायल एशियाटिक सोसायटिच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते.


            करेच्या ला कामानंतर मुंबईत १८२५ साली '' ग्रामर आफ मराठा लगवेज'  हे न्यायालयात दुभाषी असणार्‍या  महमंद इबाहीम मुकबन मुन्शी यांचे पुस्तक आले.  जे स्टिवनसन  याचे 'प्रिंसिपल आफ मराठी ग्रामर ' (१८३३) हे या विषयावरील इंग्रजीत आलेले पध्दतशीर  पुरेशा तपशीलात असणारे पुस्तक होते. 

            १८२८ मध्ये जान मक्लीन यानी मराठी भाषेतील वैद्यक शास्त्रावरचे  'औषध कल्पनिधी' हे पुस्तक प्रकाशित केले .  या पुस्तकाचे  इंग्रजी शीर्षक  '  मराठा डिसपेंसरी" असे  होते १८२९ मध्ये क्रमवंत  जगन्नाथ शास्त्री इतरांनी महाराष्ट्र भाषेचा कोश हा दोन भागांत प्रसिद्भ  केला.  'मराठयांची  बखर' हे डेविड केपन यांचे पुस्तकही  १८२९ मध्ये प्रकाशित झाले.  ही बखर ही ग्रड डफ च्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अनुवाद होता.  कंडी, टी मेजर यांचे 'नितीन परिभाषा' हे पुणे महाविद्यालयाने १८३१ मध्ये पुण्याला प्रकाशित केले.

            मोल्सवर्थ यांचा प्रसिद्भ शब्दकोश  मराठी आणि इंग्रजी हा मुंबई  प्रांतिक सरकारने १८३१  साली प्रकाशित केला.  मराठी शब्दकोशातील हा एक मैलाचा दगड मानण्यात येतो.  सहा वर्षे अथक  परिश्रम करून जमवलेले  चार ह्जार शब्द मोल्सवर्थ यांनी या  शब्दकोश  संग्रहीत केले.  यासाठी डा. विल्सन यांचा संस्क्रुत शब्दकोश कंडी यांचा इंग्रजी  मराठी  कोश आणि एल रीड रे स्टीवनसन यांच्या  पुस्त्कांचा त्यांनी संदर्भ  घेतला.


            १८३२ साली बालशास्त्री जांभेकर आणि मनी राबर्ट यांनी 'इंग्लड  देशाची बखर' हा ग्रंथ प्रकाशित केला. यात ज्युलियस सीझर पासुन क्वीन एअलिझाबेथ पर्यंत इंग़्लडंचा इतिहास समाविष्ट  होता.  १८३६ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतुन भुगोल गणित या विषयांवर दोन महत्त्वाची पुस्तके  प्रकाशित केली.  त्याच वर्षी गंगाधर शास्त्री फडके यांनी 'मराठी भाषेचे व्याकरण' प्रकाशित केले.  तसेच त्याच वर्षी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 'मराठी नकाशाचे पुस्तक ' आणि 'महाराष्ट्र भाषेचे  व्याकरण ' ही पुस्तके प्रकाशित केली.  १८५० ते १८७९ मध्ये त्यांचे पुनर्मुद्रण करण्यात आले.  नऊ नकाशे असणारा हा मराठीतील पहिला नकाशा संग्रह होता.  यांत प्रुथ्वी, आशिया, युरोप , आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, हिंदुस्तान, महाराष्ट्र आणि ग्रेट ब्रिटन यांचे नकाशे होते.  १८३९ साली बलेंटाईन  यांनी 'ग्रामर आफ मराठा  लगवेज' हे पुस्तक लिहिले.

            १८४८ साली  बर्जेस यांचे मराठी व्याकरणावरचे  'मराठी भाषेचे  व्याकरण' हे शीर्षक असणारे पुस्तक मुंबईच्या अमेरिकन मिशन प्रेसमध्ये छापुन  अहमदनगर अमेरिकन मिशनने प्रकाशित केले.  इ.  बर्जेस हे अमेरिकन मिशनरी असुन सुरूवातीस अज्ञात होते. पण नंतर मराठीला माहीते झाले. संस्क्रुत व्याकरणाच्या परंपरापासुन (प्रभावापासुन) मुक्‍त असणारे बर्जेस , यांनी काहि मुलभूत कल्पना मांडाल्या.  ज्या समकालीन नंतरच्या व्याकरणकारांना प्रेरणा देणार्‍या ठरल्या.

            जनार्दन रामचंद्रजी यांचे 'कवी  चरित्र' हे १८६० साली प्रकाशित झाले.  यात त्यांनी जुन्या मध्य  युगातील कवी लेखकांचा इतिहास लिहिला आहे.  त्यांनी संस्क्रुत, मराठी, तामिळ, तेलगु, साहित्याची माहिती देखील दिली.  साहित्य क्षेत्रातील शंकराचार्य  जयदेव, कालिदास भर्तहरी, गोरखनाथ बोपदेव, जगन्नाथ इत्यादी एकशे  सत्तर व्यक्‍तींची कालक्रमानुसार माहिती यात आहे.  'मराठी भाषेचे नवीन व्याकरण ' हे गोडबोले यांनी रचले  १८६७ साली प्रकाशित केले.

            मराठी व्याकरणाच्या या ग्रंथ परंपरेत पुढील पुस्तक म्हणजे ' स्टुडंटस मराठी ग्रामर' (मुंबई १८६८). हे गणपतराव नवलकर यांचे पुस्तक होय.  तज्ञांनी स्टीव्हनसनच्या पुस्तकापेक्षा  यास महत्त्व दिले. त्यांच्यावर बोप यांच्या व्याकरणाचा प्रभाव  होता. त्यामुळे नवलकरांनी मराठीला  ऐतिहासिक  तौलनिक द्रुष्टया झुकते माप दिले.  भाषाशास्त्राच्यातील तीन  शाखांतील ग्रंथ संचयात नवलकरांचे  पुस्तक हे परिपुर्ण अभ्यासाचे सदरीकरणाचे  निर्मितीचे आदर्श ठरले.  त्याच वर्षी ' ग्रामर आफ मराठी लगवेज' हे एच. एस. के  बेलारिस लक्ष्मण वाय असखेडकर  यांचे  पुस्तक मुंबईतील भायखळ्याच्या एज्युकेशन  सोसयटीच्या  मुद्रणालयात छापले गेले.  स्टीव्हनसन  यांचे 'प्रिंसिपल्स आफ मराठी लगवेज' हे १८८३ साली प्रकाशित झाले.  अप्पाजी काशिनाथ खेर यांचे ' हायर मराठी ग्रामर' (१८९९) हे आधी १८९५ सली ' हायर अग्लो मराठी ग्रामर' या नावाने आले होते.  त्यात बने यांच्या इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाची बरीचशी नक्कल  होती.  खेर यांच्या पुस्तकातील कच्चे  दुवे इंग्रजीच्या संदर्भात जेव्हा त्यांना विचार करावा लागला तेव्हा स्पष्ट झाले.  १८३९ ते १९६५ या दरम्यान  मराठी व्याकरणावर काही किरकोळ पुस्तके  आली, जी युरोपियन  लेखकांनी पुनर्लिखित केली होती.


            मराठी व्याकरणाच्या  या परंपरेला समांतर भारतीय माध्यतील काही पुस्तके मराठीतच आली.  यातीलच एक म्हणजे पहिले  नसले तरी, जुने  असे पुस्तक  'महारा्ष्ट्र प्रयोग चंद्रिका' हे होय.  १८२३ मध्ये रचण्यात आलेले  हे पुस्तक १९७० साली संस्क्रुतमध्ये  अज्ञात लेखकाच्या नावे पकाशित झाले.  उपलब्ध पुराव्यानुसार हे नाइ फोर्ट सेंट जार्ज़ , मद्रास येथील मराठी प्रशिक्षक व्यंकटराव हे असावे.  अतिशय लहान संस्क्रुत मधील मराठीच्या व्याकरणाचे हे पुस्तक पाणिनिच्या शैली तंत्राचे यात अनुकरण आहे.  याच काळाच्या सुमारास स्वातंत्र्य पुर्व काळातील ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत असणार्‍या तीन पंडितांचे मराठी भाषेचे व्याकरण लिहिले गेले.  मुंबईचे हे तीन पंडित म्हणजे क्रमवंत, फडके घागवे  हस्तलिखित स्वरूपातील याच्या प्रती काही वर्षे शाळामध्ये वापर्ल्या जात.  नंतर त्या हरवल्या.  सापडल्यावर मुंबईमध्ये या हस्तलिखित प्रतीवरून १९५४ साली त्याचे मुद्रण करण्यात आले.  याची एक प्रत लंडनाच्या इंडिया आफिसमध्ये  जपण्यात आली आहे.

           
            मराठी साहित्यातील मु्द्रित साधनांचा अभ्यास करतांना आपण मराठीतील संदर्भ ग्रंथ विश्व्कोश, ज्ञानकोश  आणि शब्दकोश यांकडे दुर्लक्ष  करू शकत नाही.   विश्वकोश हे इतिहास  संस्क्रुती समाजाची नैतिक  जडाण घडण जाणुन घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे.  ही संदर्भ साधने भाषेतील ज्ञान  सम्रुद्भ करतात.  विद्यार्थी, संशोधक  तसेच  सामाजिक, राजकीय  सांस्क्रुतिक कार्यकर्ते  यांच्यासाठी ते उपयुक्‍त असतात.

           
            ज्ञानाकोशांची परंपरा १८ व्या शतकांपासुन पहावयास मिळते. 'एनसायक्लोपिडीया आफ    सिस्टीमटीक  डिक्शनरी आफ सायन्ससेस, आर्टस  अड  क्राफ्टस' डीडेरोड यांनी संपादित केलेला फ्रान्स मध्ये १७५१ ते १७७२ या काळात सुधारित आव्रत्या, भाषांतरे झालेला पहिला ज्ञानकोश होय.  अनेकांकडुन घेण्यात आलेल्या लेखनांचा समावेश असणारा हा पहिला ज्ञानकोश होता तसेच यांत्रिक कलांच्या  संदर्भात ढळढळीतपणे लक्षात येईल.  असा पहिला साधारण (समावेशक )  ज्ञानकोश होता.  १७६८ ते १७७१ मध्ये एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाची पहिली आव्रुती इंग्रजीत प्रकाशित झाली.  या ज्ञानकोशाने अद्ययावत पणा नवीन आव्रुत्या प्रकाशित करून महत्त्व प्राप्त केले.  'ब्रिटानिका बुक आफ इयर' या नावाने हा ज्ञानकोश वार्षिक आव्रुती प्रकाशित करतो.  १५ वेळेला तू पुनरर्चित करण्यात आला.  त्याची पंधरावी आव्रुती ' न्यु एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका  - ३२ खंड' नावाने प्रकाशित  झाली.


            वरील ज्ञानकोशापासुन प्रेरणा घेऊन ड. श्रीधर व्यंकटेश  केतकर यांनी सिद्धेश्वर शास्त्री  चित्राव, वि. का. राजवाडे, य. रा. दाते, चि. ग. कर्वे यांच्या मदतीने 'महाराष्ट्रीय  ज्ञानकोश प्रकाशित केला.  अशा प्रकारच्या मराठीत ज्ञानकोश  संकलित करून  प्रकाशित  करणारे डा. केतकर हे आद्य कोशकार होत.  १९२० ते १९२९ या कालाखंडात २३ खंडामध्ये हा कोश प्रकाशित झाला.  हा संच 'हिदुस्तान आणि जग' वेदविद्या 'बु्ध्दपुर्व  जग'  युध्दोत्तर जग आणि विज्ञान इतिहास अशा पाच भांगात विभागलेला  होता. 

            सिध्देश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश प्रकाशित केला.  प्राचीन चरित्रकोश १९३२ मध्युगीन चरित्रकोश  १९३७ आणि अर्वाचीन चरित्रकोश  १९४६ अशा तीन भागात तो होता.  १९६२  मध्ये  पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी १० खंडातील  'भारतीय  संस्क्रुती कोशाचे' काम हाती घेतले.  प्रा. देवीदास दत्तात्रय वाडेकर यांनी मराठी 'तत्त्वज्ञान महाकोश संपादित केला. १९७४ साली पुण्याच्या  'मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळाने तो तीन खंडात प्रकाशित केला.


            महाराष्ट्र राज्य शासनाने पुढाकार घेऊन परिपुर्ण असा कोश बनवण्याचे काम हाती घेतले त्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुती मंडळ स्थापन  करण्यात आले.  तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची मंडळाचे पहिले अध्यक्ष  २० खंडामध्ये प्रकाशित व्हायच्या विश्वकोशाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पहिले संपादक म्हणुन नेमणुक झाली.  आजवर यांतील १८ खंड प्रकाशित झाले आहेत.


            सामाजिक शास्त्रांचा  विशेष ज्ञानकोश 'भारतीय समाज विज्ञानकोश' या नावाने संअ. गर्गे यांनी १९८६ ते १९९३ या काळात प्रकाशित केला.


            समारोप करताना असे म्हण्ता येईल की, मराठी संदर्भ ग्रंथांच्या प्रकाशनाचा इतिहास तीन टप्यांत  विभागलेला दिसतो.  अध्यात्मिक  ज्ञान केंद्रित, व्याकरण तद्दविषयक पुस्तके, , मराठीतील पारंपारिक संदर्भ ग्रंथ असे हे तीन टप्पे  होत.  हा निबंध मराठी संदर्भ ग्रंथांचा संक्षिप्त आढावा आहे.
           

















No comments:

Post a Comment